अंत्यसंस्काराला जात असताना भरधाव कंटनेर कारवर उलटला, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी जात असताना भरधाव कंटनेर कारवर उलटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलाचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली.

उत्तर प्रदेशातील सहारनपूरच्या गागलहेडी येथे शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला. सैयद माजरा येथील कुटुंब गंगोह येथे नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी चालले होते. यादरम्यान गागलहेडी येथे अनियंत्रित टँकर त्यांच्या कारवर उलटला. यात कुटुंबाचा मृत्यू झाला. संदीप, जॉली देवी, शेखर कुमार, राणी देवी, विपिन, आणि राजू सैनी अशी मृतांची नावे आहेत. मृतांमध्ये एका मुलाचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.