एनडीए-पाषाण रोडवर बिबटय़ाचे दर्शन, व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील विविध भागांत बिबटय़ा आढळल्याची चर्चा सुरू असून त्याचे सीसीटीव्ही फुटेजसह फोटो व्हायरल केले जात आहेत. विमानतळ, औंधनंतर आता एनडीए-पाषाण रस्त्यावर हॉटेल डी पॅलेस परिसरात बिबटय़ा फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. वन विभागाकडून याबाबत अधिकृत काही सांगण्यात आलेले नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून वन विभागाने बिबटय़ाच्या हालचालींकर लक्ष ठेकण्यासाठी ट्रपकॅमेरा लाकण्याचे काम सुरू आहे. तसेच बिबटय़ाला जेरबंद करण्यास प्राधान्य देण्यात आल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.