
बीड जिल्ह्यातील गेवराई नगर पालिका निवडणुकीत मतदानाच्या वेळेस राडा झाला. हिंसक वळण मिळाले. भाजपचे माजी आमदार लक्ष्मणराव पवार यांच्या घरासमोर दगडफेक करण्यात आली. गाड्या फोडण्यात आल्या. तर याच वेळी राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांचे मोठे बंधू जयसिंह पंडित आणि माजी मंत्री बदामराव पंडित यांचे चिरंजीव युद्धाजित पंडित हे ही समोरासमोर आल्याने गेवराईमध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे.
गेवराईमध्ये राडा, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने, भाजप नेत्याच्या घरासमोर दगडफेक, गाड्या फोडल्याhttps://t.co/dV7j9biwvX pic.twitter.com/oiWGUccssM
— Saamana Online (@SaamanaOnline) December 2, 2025
गेवराई नगर पालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना अचानक हिंसक वळण लागले. राष्ट्रवादीचे पंडित गट आणि भाजपचा पवार गट यांच्यात मोठा तणाव निर्माण झाला. भाजपचे माजी आमदार लक्ष्मणराव पवार यांच्या घरासमोरच दगडफेक झाली. दोन्ही बाजूने एकमेकांवर हल्ला चढवण्यात आला. या दरम्यानच विजयसिंह पंडितांचे बंधू जयसिंह पंडित आणि बदामराव पंडितांचे चिरंजीव युद्धाजित पंडित हे ही आमने सामने आले. शहरात तणावाची परिस्थिती असून वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. घटनास्थळी तणावाचे वातावरण असल्याची माहिती मिळताच गेवराईत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. काही ठिकाणी लाठीचार्ज झाल्याची घटना घडली आहे. .































































