बांगलादेशातील 13 मच्छीमारांना पकडले

आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथील स्थानिक लोकांनी 13 बांगलादेशी मच्छीमारांना पकडले. हे मच्छीमार हिंदुस्थानच्या हद्दीत आले होते. हे मच्छीमार बांगलादेशातील भोला जिह्यातील रहिवासी आहेत. 10 नोव्हेंबरला मासे पकडण्यासाठी ते ढाकातून निघाले होते. त्यांच्याकडे केवळ 7 दिवसांचे जेवण होते. जेवण संपल्यानंतर ते केवळ पाणी पिऊन जिवंत राहिले. स्थानिकांनी त्यांना जेवण दिले. पोलिसांनी सर्वांना पोलीस कस्टडीत घेतले आहे.