इस्रायल लष्करात अँड्रॉईड फोनवर बंदी

इस्रायल डिफेन्स फोर्सने सायबर सुरक्षेला मजबूत करण्यासाठी कडक पाऊल उचलले आहे. इस्रायलमधील लेफ्टिनेंट कर्नल व त्यापेक्षा वरच्या पदावर कार्यरत वरिष्ठ अधिकाऱ्यांना अँड्रॉईड फोन वापरण्यास बंदी घातली आहे. हे अधिकारी केवळ आयफोन वापरू शकतील. सुरक्षेचे कारण पुढे करत अँड्रॉईड फोन वापरण्यावर बंदी घातली आहे.