हे करून पहा- टोमॅटो खराब होऊ नये म्हणून

टोमॅटो जास्त दिवस टिकावे ते लवकर खराब होऊ नये यासाठी काही गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेवणे गरजेचे आहे. सर्वात आधी  टोमॅटो थंड, गडद आणि हवेशीर ठिकाणी ठेवा. स्वयंपाकघरातील कपाटासारखी जागा उत्तम आहे. टोमॅटो धुण्यापूर्वी साठवा आणि वापरण्यापूर्वी धुवा. टोमॅटो एकमेकांवर ठेवू नका.

जास्त पिकलेले टोमॅटो खराब होण्यापासून वाचविण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. जर तुम्ही टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवत असाल, तर त्यांना धुवा आणि पूर्णपणे कोरडे करा. नंतर ते एका टोपलीत ठेवून फ्रीजमध्ये ठेवा. लहान टोमॅटो एका बेकिंग शीटवर पसरवून गोठवा. त्यांना झिप-लॉक बॅगमध्ये किंवा जारमध्ये भरून पुन्हा फ्रीजरमध्ये ठेवा.