‘वंदे मातरम, जय हिंद’वरील बंदी मागे घ्या, शिवसेनेची मागणी; राज्यसभेच्या सभापतींना खासदारांचे निवेदन

राज्यसभेत राज्यसभा सचिवालयाने, संसद सदस्याने भाषण केल्यानंतर जय हिंद, वंदे मातरम यांचा जयघोष करण्यास मज्जाव केला आहे. राज्यसभेच्या सचिवालयाने जारी केलेले हे परिपत्रक तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी शिवसेनेने आज केली.

लोकसभेतील शिवसेना गटनेते खासदार अरविंद सावंत व राज्यसभेतील शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी आज उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी वंदे मातरम, जय हिंद, धन्यवाद या उद्घोषावरील बंदी तातडीने मागे घेण्याची विनंती केली. खा. चतुर्वेदी यांनी यासंदर्भात राज्यसभा सभापतींना पत्रही लिहिले आहे. या पत्रात त्यांनी या परिपत्रकासंदर्भातील स्थिती सचिवालयाने स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.