
दिल्ली महानगरपालिका (MCD) च्या १२ वॉर्डांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी सध्या सुरू आहे. ताज्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाने (BJP) ४ जागा आणि आम आदमी पार्टी (AAP) यांनी २ जागा जिंकल्या आहेत. यासोबतच, काँग्रेसनेही संगम विहार-ए जागा जिंकून दिल्लीमध्ये आपले खाते उघडले आहे. तर ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक (AIFB) ने देखील एक जागा जिंकली आहे.
३० नोव्हेंबर रोजी मतदान झालेल्या १२ वॉर्डांपैकी, यापूर्वी नऊ वॉर्डांवर भाजपचे वर्चस्व होते, तर उर्वरित तीन वॉर्ड ‘आम आदमी पार्टी’ (AAP) कडे होते. २०२२ मध्ये २५० वॉर्डांसाठी झालेल्या एमसीडी निवडणुकीत ५०.४७ टक्के मतदान झाले होते, तर या पोटनिवडणुकीत ३८.५१ टक्के मतदान झाले. सध्याच्या माहितीनुसार भाजपने चार जागा जिंकल्या तर तीन जागांवर आघाडीवर आहे. आप ने दोन जागा जिंकल्या असून एका जागेवर आघाडीवर आहे. यातून गेल्यावेळेपेक्षा भाजपच्या दोन जागा घटल्याचे स्पष्ट होत आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मतमोजणीसाठी १० केंद्रे उभारण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर विशिष्ट वॉर्डांची मतमोजणी हाताळली जाईल आणि येथे स्ट्राँग रूम सुविधा तसेच सुरक्षित प्रवेश आणि निर्गमन प्रोटोकॉलची व्यवस्था करण्यात आली आहे.
MCD निकाल LIVE अपडेट: ८ जागांचे निकाल जाहीर
पक्षजिंकलेल्या जागा (जाहीर)
भाजप (BJP)४
आप (AAP)२
काँग्रेस (Cong)१
एआयएफबी (AIFB)१
मतमोजणीत आघाडी
भाजप – ३
आप – १



























































