
काही नगरपरिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्वच 288 परिषदा आणि पंचायतींची एकत्र मतमोजणी 21 डिसेंबर रोजी करण्याचे आदेश दिले आहेत. या निकालाला आज राजकिरण बर्वे आणि एमआयएमचे प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद युसूफ पुंजानी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तत्काळ मतमोजणीची त्यांची मागणी आहे. या याचिकेवर उद्या सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्या. जॉयमाल्या बागची यांच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे तातडीची सुनावणी होणार आहे.


























































