
भाजप सरकारचा नावे बदलण्याचा कार्यक्रम जोरात सुरू आहे. पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलून ‘सेवा तीर्थ’ करण्यात आले. पेंद्रीय सचिवालयाचे ‘कर्तव्य भवन’ असे नामांतर करण्यात आले. त्याचवेळी राज्यपाल, नायब राज्यपाल यांचे निवासस्थान ‘लोक निवास’ म्हणून ओळखले जाईल, तर त्यांच्या कार्यालयांचे नाव ‘लोक भवन’ राहणार, असे नमूद करण्यात आले होते. तशा मार्गदर्शक सूचनाही पेंद्र सरकारकडून सर्व राज्यांसाठी जारी करण्यात आल्या होत्या. या सूचनांनुसार महाराष्ट्रात राज्यपालांच्या निवासस्थानावरील पाटी गुरुवारी बदलण्यात आली. राजभवन ही पाटी काढून त्याजागी ‘महाराष्ट्र लोकभवन’ हे नाव झळकवण्यात आले आहे. मुख्य प्रवेशद्वारासह अन्य ठिकाणीही हा बदल करण्यात आला आहे. दरम्यान, मोदी सरकारने दिल्लीत राजपथचे ‘कर्तव्यपथ’, रेसकोर्स रोडचे ‘लोककल्याण मार्ग’ अशी नावे बदलली आहेत.

























































