
पश्चिम बंगालमध्ये बाबरी मशीद बांधण्याची घोषणा करणाऱया हुमांयू कबीर या तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची पक्षाने सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली. त्याच्या घोषणेवरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री प्रचंड नाराज झाल्याचे बोलले जात होते.
कबीर याने मुर्शिदाबाद येथील बेलडांगा येथे बाबरी मशीद बांधण्याची घोषणा केली होती. त्याने 6 डिसेंबर रोजी मशिदीचा पायाभरणी समारोह होणार असल्याचे पोस्टर्स मुर्शिदाबाद जिह्यात अनेक ठिकाणी लावले होते. त्यात हुमायू कबीर याला आयोजक म्हटले होते. यावरून वाद निर्माण झाला होता. आता त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते व कोलकाताचे महापौर फिरहाद हकमी यांनी सांगितले की, पक्ष जातीयवादी राजकारणावर विश्वास ठेवत नाही. तो बाबरी मशीद का बांधेल? याबाबत हुमायू याला यापूर्वीदेखील इशारा दिला होता.

























































