अक्षय खन्नाचा ‘हा’ लूक पाहून भरेल धडकी, आगामी चित्रपटाचे पोस्टर होतेय व्हायरल

धुरंदर हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहेत. या चित्रपटात अक्षय खन्नाने वठवलेली रेहमान डकैतची भूमिका तर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अक्षयचे डायलॉग, त्याचा डान्स, त्याचे एक्सप्रेशन, त्याने दाखवलेली क्रूरता सर्वच सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एकीकडे रेहमान डकैतच्या भूमिकेवरून अक्षय खन्नाचे कौतुक होत असतानाच त्याच्या आगामी तेलगू चित्रपटातील लूक व्हायरल झाला आहे.

अक्षय खन्ना प्रशांत ‘महाकाली’ या चित्रपटात शुक्राचार्यांच्या भूमिकेत दिसणार असून त्याचा हा लूक सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित झाला होता. मात्र त्यावेळी या लूकची इतकी चर्चा झाली नाही. आता धुरंदर रिलीज झाल्यानंतर अक्षय खन्नाच्या चाहत्यांनी त्याचा महाकाली मधली लूक व्हायरल केला आहे.

अक्षय खन्नाने स्वत: कोरिओग्राफ केलाय धुरंदरमधला डान्स

धुरंदरमधला रेहमान डकैतचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या डान्समधील अक्षय खन्नाच्या स्टेप्स, त्याचे एक्सप्रेशन सर्वच अफलातून असल्याची प्रतिक्रीया प्रेक्षक देत आहेत. तो डान्स कुठल्या कोरिओग्राफरने बसवला नसून अक्षय खन्नाने स्वत:च तशा प्रकारे डान्स करत एन्ट्री घेतली. अक्षयची ती एन्ट्रीच आता धुमाकूळ घालत आहे.