
सर्वसामान्यांना घर घेता यावे यासाठी म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून घरे बांधली जातात. बाजारभावाच्या तुलनेत या घरांचे दर कमी असतात, परंतु म्हाडाच्या तुलनेत सिडकोची घरे महाग आहेत. ती सर्वसामान्यांच्या आवाक्यात यावीत यासाठी राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेतला. सिडकोच्या घरांच्या किमती तब्बल 10 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा आज विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या घोषणेमुळे सिडकोच्या सुमारे 17 हजार घरांची किंमत कमी होणार आहे.
हिवाळी अधिवेशनात आज विधान परिषदेत शिंदे यांनी विरोधकांच्या चर्चेवर निवेदन केले. यावेळी त्यांनी सिडकोच्या घरांची किंमत 10 टक्क्यांनी कमी केली जाणार असल्याची घोषणा केली.


























































