
जुनी पेन्शन लागू करा, यासह विविध मागण्यांच्या समर्थनार्थ शनिवारी शिक्षक आमदारांनी विधानभवन परिसरात आंदोलन केले.
गेल्या काही वर्षांपासून शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी होत आहे. अशात शनिवारी विविध पक्षांच्या शिक्षक आमदारांनी डोक्यावर ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ लिहीलेल्या पिवळ्या रंगाच्या टोप्या घालून विधानभवन परिसरात आंदोलन केले. यामध्ये आमदार विक्रम काळे, आमदार किरण सरनाईक, आमदार ज. मो. अभ्यंकर, आमदार प्रा. किशोर दराडे, आमदार प्रा. जयंत आसगावकर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा सहभाग होता. त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांचा टप्पा द्या, मूल्यांकनास पात्र ठरणाया सर्व शाळांना अनुदान द्या, वरिष्ठ महाविद्यालयाचा कायम शब्द काढून अनुदान द्या या मागण्या करण्यात आल्या.


























































