
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी शंभर वर्षांपूर्वी सुरू केलेली ‘श्री छत्रपती शाहू मिल्स्’ ही ऐतिहासिक कापड मिल गेल्या 20 ते 25 वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. याठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याबाबत घोषणा झालेल्या आहेत. याकडे पुन्हा लक्ष वेधण्यासाठी आज या मिलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच ‘दार उघडा, सरकार दार उघडा’ हे प्रतीकात्मक ठिय्या आंदोलन करण्यात आले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी 100 वर्षांपूर्वी सुरू केलेली ‘श्री छत्रपती शाहू मिल्स्’ ही गिरणी सुमारे 25 वर्षांपूर्वी शासनाच्या वस्त्र्ााsद्योग विभागाने बंद केली आहे. ही जागा जिह्याच्या दृष्टीने उपयुक्त अशा विविध सामाजिक उपक्रमांसाठी वापरण्यात यावी, अशी कोल्हापूर जिल्हावासियांची अनेक वर्षांची मागणी आहे. महाराष्ट्र शासनाने या उपक्रमांची सुरुवात करावी, यासाठी सुमारे तीन वर्षांपूर्वी ‘पदवीधर मित्र’ आयोजित सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन, राज्य शासनाने वस्त्र्ााsद्योग खात्याची जमीन आपल्याकडे तत्काळ वर्ग करून घेतली; पण त्यानंतर आजपर्यंत या मिलच्या जागेत कोणत्याही प्रकारच्या विकासकामांची सुरुवात झालेली नाही. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा श्री छत्रपती शाहू मिलच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘दार उघडा, सरकार दार उघडा’ हे प्रतीकात्मक ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी डॉ. रवि मोरे, माणिक पाटील-चुयेकर यांच्यासह विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.





























































