
मुंबई महानगरपालिकेच्या यादीत 11 लाख संभाव्य दुबार मतदार असल्याचे समोर आले आहे. महापालिकेकडून यासंदर्भात सविस्तर आढवा घेण्यात आला असून घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. मुंबईत साधारण 70 ते 80 हजार दुबार मतदार असण्याची शक्यता आहे, असे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात बोलताना स्पष्ट केले.
राज्यातील इतर पालिकांच्या क्षेत्रात साधारण 5 ते 20 टक्के संभाव्य दुबार मतदार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली. दुबार आणि बोगस मतदान टाळण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱयांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दुबार मतदान रोखण्याबाबतही त्यांनी आश्वस्त केले.

































































