
महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडची मोकळी जागा मिळून एकूण 295 एकरवर जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क उभारले जाणार आहे. प्रस्तावित सेंट्रल पार्कचा आराखडा आज पालिकेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सादर करण्यात आला. या वेळी आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते.
महालक्ष्मी रेसकोर्सवरील 125 एकरवर जागतिक दर्जाच्या सेंट्रल पार्कची उभारणी होतेय. कोस्टल रोडची 170 एकर जागा असे एकूण 295 एकरचे भवदिव्य सेंट्रल पार्क तयार केले जाणार आहे. तसेच सेंट्रल पार्कखाली 10 लाख चौरस फुटांचे जागतिक दर्जाचे स्पोर्टस् कॉम्प्लेक्सही विकसित केले जाणार आहे. यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळांसह खो-खो, कबड्डी अशा मराठमोळ्या खेळांसाठीही सुविधा उपलब्ध होईल. हे स्पोर्टस् कॉम्प्लेक्स पर्यावरणपूरक बनवण्यात येणार आहे. कोस्टल रोड पार्ंकगमध्ये 1200 गाडय़ा, 100 बसेस पार्क करण्याची क्षमता आहे.






























































