Latur Accident दोन कारची समोरासमोर धडक, भीषण अपघात तिघांचा जागीच मृत्यू

लातूर राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओ आणि कार यांच्यात सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात बीड – लातूर जिल्ह्याच्या सीमेवर घडला. वेगात असलेल्या स्कॉर्पिओ आणि कारची जोरदार धडक बसल्याने दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. गंभीर जखमींना तात्काळ लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातातील मृत व जखमी कोणत्या गावचे आहेत, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. घटनेची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.