रक्तरंजित थरार! भरवर्गात मित्राकडून मित्राचाच खून

जुन्या वादातून मित्रानेच दहावीच्या खासगी कोचिंग क्लासमध्ये शालेय विद्यार्थ्यावर चाकूने गळा आणि पोटावर वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी राजगुरू नगरमध्ये घडली. क्लासमध्येच रक्तरंजित थरार घडल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुष्कर दिलीप शिंगाडे (वय 16, रा. सह्याद्री सोसायटी, वाडा रोड, राजगुरू नगर, ता. खेड) असे हत्या झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी 16 वर्षीय हल्लेखोर अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. राजगुरू नगरमध्ये दहावीच्या वर्गात शिकत असलेला पुष्कर शिंगाडे आणि त्याचा मित्र यांच्यात 13 डिसेंबरला भांडण झाले होते. दोघेही एकाच खासगी कोचिंग क्लासमध्ये होते. आज सकाळी पुष्करसह आरोपी वर्गात बसला होता. त्यावेळी ही घटना घडली.