शेअर गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या सायबर ठगाला अटक

शेअर गुंतवणुकीच्या नावाखाली वृद्धाची 84 लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी एकाला पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. जयदीप देसाई असे त्याचे नाव आहे. सायबर ठगांना बँक खाती पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. ज्येष्ठ नागरिक असणाऱया तक्रारदाराला जून महिन्यात ते फेसबुकवर एका तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. तिने ती बंगळुरू येथे एका खासगी कंपनीत काम असल्याचे भासवले. त्यानंतर तिने तिच्या कंपनीची माहिती देऊन गुंतवणुकीबाबत आमिष दाखवले. त्या तरुणीच्या भूलथापांना बळी पडून 84 लाख 43 हजार 365 रुपयांची गुंतवणूक केली. त्या गुंतवणुकीवर 2 कोटी 23 लाख रुपये प्राप्त झाल्याचे भासवण्यात आले. ही रक्कम काढण्यासाठी 33 लाख रुपयांची मागणी केली. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून जयदीपला सुरत येथून ताब्यात घेऊन अटक केली.