गोवा नाइट क्लब अग्निकांड, लुथरा बंधूंचे प्रत्यार्पण; गोवा पोलिसांनी केली अटक

Goa Nightclub Owners Saurabh and Gaurav Luthra's Passports Suspended Amid Fire Probe

गोवा अग्निकांडानंतर फरार झालेले ‘बर्च बाय रोमियो लेन’ नाइट क्लबचे मालक गौरव आणि सौरभ लुथरा या दोघांना आज थायलंड सरकारने हिंदुस्थानच्या हवाली केले. दिल्ली विमानतळावर उतरताच गोवा पोलिसांनी त्यांना अटक केली.

लुथरा बंधूंच्या मालकीच्या नाइट क्लबला आग लागून त्यात 25 जणांचा मृत्यू झाला होता. या क्लबचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे व नोटीस देऊनही तो सुरू असल्याचे चौकशीत आढळले होते. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांची धरपकड सुरू केली होती, मात्र त्याआधीच लुथरा बंधू रातोरात थायलंडला पसार झाले. हिंदुस्थान सरकारने लगेचच थायलंड सरकारशी चर्चा करून प्रत्यार्पण प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर त्यांना थायलंडमध्ये अटक करण्यात आली. आज त्यांचे प्रत्यार्पण करण्यात आले. त्यांना दिल्ली न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्यानंतर गोव्याला नेण्यात येणार आहे.