National Herald Case – गांधी कुटुंबाला त्रास देण्याचे षडयंत्र, खरगे यांचा भाजपवर हल्लाबोल

‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पुन्हा एकदा भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. हे प्रकरण राजकीय द्वेष आणि सूड भावनेतून तसेच गांधी कुटुंबाला त्रास देण्याच्या उद्देशाने केलेले आहे. या प्रकरणी कुठलाही एफआयआर नोंद नसूनही एक षडयंत्र रचत हे प्रकरण भाजपकडून वाढवले जात आहे, असे खरगे म्हणाले.

मल्लिकार्जुन यांनी पक्षाच्या तत्वांचा दाखला देत सत्यमेव जयते आमचा नारा असून काँग्रेस या प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करते. त्यांच्यानुसार काँग्रेस याप्रकरणी सत्याच्या बाजूने उभी आहे आणि त्याला राजकीय षडयंत्राच्या रुपातच पाहिले जाईल, असे खरगे म्हणाले.

दरम्यान, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी नॅशनल हेराल्ड देशाची शान आहे. ज्याला महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य चळवळीदरम्यान सुरू केले होते. मी एक प्रश्न विचारतो की त्यांनी आतापर्यंत एफआयआरची कॉपी का दिलेली नाही? आज ईडीची प्रतिमा मलिन झाली असल्याचे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.