फोटो एडिट करणे आणखी सोपे, चॅटजीपीटी इमेज 1.5 लाँच

चॅटजीपीटीच्या मदतीने आता फोटो एडीट करणे आणखी सोपे होणार आहे. चॅटजीपीटीने इमेज 1.5 लाँच केले आहे. या फीचरच्या मदतीने नवीन फोटो बनवणे आणि जुने फोटो एडीट केले जाऊ शकतात. फोटोला 3डीमध्ये बदलणे, स्केच बनवणे, प्लश टॉय डिझाइन करणे, डूडल बनवणे यांसारखी कामे केली जाऊ शकतील. ओपनएआयचे सीईओ सॅम अल्टमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमेज 1.5 हे लाँच केले असून एपीआयद्वारे उपलब्ध आहे. या फीचरमध्ये जबरदस्त क्वॉलिटीचे फोटो, वेगवान रिझल्ट आणि नवीन एडिटिंग टूल मिळतील. या फीचरचा वापर करणे खूपच सोपे आणि मजेदार आहे, असे अल्टमन यांनी म्हटले आहे.