पंतकडे सूत्रे, कोहलीची साथ; विजय हजारेसाठी दिल्ली सज्ज

बंगळुरूमध्ये 24 डिसेंबरपासून सुरू होणाऱया विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी हिंदुस्थानी यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतकडे दिल्ली संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. विराट कोहली, इशांत शर्मा आणि नवदीप सैनी यांच्या उपस्थितीमुळे दिल्ली संघ अधिक भक्कम झाला आहे. बीसीसीआयने सेंट्रल कॉण्ट्रक्ट असलेल्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे बंधनकारक केल्याने हर्षित राणादेखील संघात सहभागी होणार आहे. दिल्ली आपले सुरुवातीचे सामने आंध्र आणि गुजरातविरुद्ध चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळणार असून उर्वरित सामने अलूर मैदानावर होतील. कोहली आणि पंत 17 जानेवारीपर्यंत दिल्लीसाठी उपलब्ध असतील. 2012-13 मध्ये विजेतेपद मिळवणाऱया दिल्लीकडून यंदा दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.