सोमवार ते शुक्रवार दादर, धारावी, अंधेरी, वांद्र्यात पाणीकपात

 

पालिकेच्या माध्यमातून जी उत्तर दादर, धारावी, के पूर्व अंधेरी विभाग आणि एच पूर्व वांद्रय़ातील मोठय़ा आकाराच्या जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेतले जाणार आहे. हे काम 22 डिसेंबर सकाळी 10 वाजल्यापासून 26 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत (एकूण 99 तास) सुरू राहणार आहे. परिणामी, जी उत्तर, के पूर्व आणि एच पूर्व विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. तसेच नियमित पाणीपुरवठय़ाच्या वेळेतदेखील बदल होणार आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.