अंतराळाचे अंतरंग- मंगळाचा गुरुत्वीय व्यत्यय आणि पृथ्वीचे हवामान

>> सुजाता बाबर

[email protected]

मंगळ आणि पृथ्वी यांच्या कक्षा एकमेकांच्या तुलनेत ठरावीक प्रमाणात सुसंगत हालचाल करतात. या सुसंगततेमुळे निर्माण होणारा गुरुत्वीय व्यत्यय पृथ्वीच्या कक्षेतील सूक्ष्म बदलांना चालना देतो. हे बदल इतके संथ असतात की, मानवी आयुष्यात त्यांची जाणीव होत नाही, पण भूवैज्ञानिक काळात ते निर्णायक ठरतात.

पृथ्वीचे हवामान हे केवळ वातावरणातील वायू, ढग, महासागरांचे प्रवाह किंवा मानवी हस्तक्षेप याचा परिपाक नाही. अंतराळाची दीर्घकालीन, संथ पण प्रभावी अशी खगोलीय यंत्रणादेखील त्यावर कार्य करत असते. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना तिच्या हालचाली पूर्णपणे स्थिर नसतात. त्या हालचालींवर सौरमालेतील इतर ग्रहांचे गुरुत्वाकर्षण सतत परिणाम करत असते.

अलीकडील संशोधनाने या प्रािढयेत मंगळ ग्रहाची भूमिका समोर आणली आहे. पृथ्वीची सूर्याभोवतीची कक्षा पूर्णपणे गोल नसून किंचित लंबगोलाकार आहे. ही लंबगोलाकार कक्षा काळानुसार बदलत राहते. त्याचप्रमाणे पृथ्वीचा अक्ष साधारणपणे 23 अंशांनी झुकलेला आहे, पण हा झुकावही कायम समान राहत नाही. कधी तो वाढतो, कधी कमी होतो. या दोन बदलांमुळे पृथ्वीवर किती सूर्य ऊर्जा पोहोचते, ती कुठल्या अक्षांशांवर अधिक केंद्रित होते आणि ऋतू किती तीव्र असतात हे ठरते. या दीर्घकालीन बदलांमुळेच पृथ्वीवर हिमयुगे येतात आणि नंतर उष्ण काळ निर्माण होतो.

या पांना वैज्ञानिक भाषेत `दीर्घकालीन खगोलीय हवामान पा’ असे म्हणतात. ज्यावर सौरमालेतील ग्रहांचे गुरुत्वाकर्षण प्रभाव करते. आतापर्यंत प्रामुख्याने गुरू ग्रहाच्या भूमिकेवर भर दिला जात होता. कारण त्याचे वस्तुमान प्रचंड आहे. मात्र अलीकडील अभ्यासातून असे दिसून आले आहे की, मंगळ ग्रह जरी आकाराने लहान असला तरी त्याचा परिणाम दुर्लक्षित करता येण्यासारखा नाही. मंगळ ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या सुमारे दहाव्या भागाइतके आहे व  सूर्यापासूनचे अंतर पृथ्वीच्या कक्षेच्या तुलनेत थोडे अधिक आहे. या स्थानामुळे मंगळ आणि पृथ्वी यांच्या कक्षा एकमेकांच्या तुलनेत ठरावीक प्रमाणात सुसंगत हालचाल करतात. या सुसंगततेमुळे निर्माण होणारा गुरुत्वीय व्यत्यय पृथ्वीच्या कक्षेतील सूक्ष्म बदलांना चालना देतो. हे बदल इतके संथ असतात की, मानवी आयुष्यात त्यांची जाणीव होत नाही, पण भूवैज्ञानिक काळात ते निर्णायक ठरतात. मंगळ ग्रहाचे वस्तुमान बदलले किंवा तो अस्तित्वातच नसता तर पृथ्वीच्या कक्षेवर काय परिणाम झाला असता? मंगळ ग्रह नसता तर पृथ्वीची कक्षा अधिक अस्थिर झाली असती. तिच्या कक्षेतील लंबगोलाकारता अधिक वेगाने बदलली असती आणि अक्षीय झुकावातील चढ-उतार अधिक टोकाचे झाले असते. याचा थेट परिणाम पृथ्वीवरील दीर्घकालीन तापमान वितरणावर झाला असता. ध्रुवीय भागांमध्ये हिमनद्या अधिक वेगाने वाढल्या किंवा वितळल्या असत्या. हिमयुगांचा कालावधी, त्यांची तीव्रता, त्यांतील  अंतर आज आपल्याला माहीत असलेल्या भूगर्भीयािढयांपेक्षा वेगळे दिसले असते.

पृथ्वीवरील जीवसृष्टीचा उपांतीचा प्रवासही त्यामुळे वेगळ्या मार्गाने घडला असता. महत्त्वाची बाब म्हणजे हा प्रभाव तत्काळ होत नाही. मंगळ ग्रहाचा हस्तक्षेप क्षणिक हवामान घटनांवर परिणाम करत नाही. तो पावसाचे प्रमाण, वादळे किंवा एका दशकातील तापमान बदल ठरवत नाही. त्याचा प्रभाव लाखो वर्षांच्या कालखंडात पृथ्वीच्या हवामानाची चौकट ठरवणारा आहे. पृथ्वीवर जीवन टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेली तुलनात्मक स्थिरता या गुरुत्वीय संतुलनामुळेच निर्माण झाली असावी असा विचार मांडला जात आहे. पृथ्वी ही स्वतंत्र प्रणाली नाही. ती सौरमालेतील गुरुत्वाकर्षणाच्या जाळ्यात घट्ट गुंतलेली आहे. मंगळ ग्रह या जाळ्यातील एक सूक्ष्म पण महत्त्वाचा आपल्या जवळ असलेला धागा आहे. त्याची उपस्थिती पृथ्वीच्या कक्षेला एका मर्यादेत बांधून ठेवते.

पृथ्वीच्या हवामानाचा संपूर्ण इतिहास समजून घ्यायचा असेल तर खगोलीय घटकांचा विचार अपरिहार्य आहे. पृथ्वीवर घडणाऱया मोठय़ा प्रािढया अनेकदा आपल्या दृष्टीआड, संथ आणि शांतपणे कार्यरत असलेल्या शक्तींनी घडवलेल्या असतात. पृथ्वीचे हवामान हे स्थानिक किंवा केवळ ग्रहांतर्गत वास्तव नसून ते सौरमालेतील परस्परसंलग्न हालचालींचा परिणाम आहे. मंगळ ग्रह त्या प्रािढयेतील एक लहानसा पण निर्णायक घटक आहे.

(लेखिका खगोल अभ्यासक आहेत.)