
रत्नागिरी शहरात बिबट्याने शिरकाव केल्याने रत्नागिरीकरांची झोप उडाली आहे.दोन दिवसांपूर्वीच अभ्युदयनगर येथे सीसीटिव्हीत बिबट्या दिसला होता.यापार्श्वभूमीवर पोलिसांनी थिबा पॅलेस, विश्वनगर, आंबेशेत परिसरातील सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे आहे की,मॉर्निंग वॉकला एकटे-दुकटे फिरू नका.बिबट्या हा वन्य प्राणी आहे आणि तो सामान्यतः माणसांना टाळतो. पण काही वेळा अन्नाच्या शोधात किंवा घाबरून तो मानवी वस्तीत येतो. अशा वेळी आपण सर्वांनी एकत्रितपणे काही सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपण स्वतः आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकतो.
रात्री घराबाहेर छोट्या मुलांना एकटे सोडू नका
विशेषतः ६-७ वाजल्यानंतर लहान मुलांना एकटे खेळायला किंवा फिरायला पाठवू नका.कचरा आणि अन्नाचे तुकडे घराबाहेर ठेवू नकाकुत्र्याचे अन्न, कोंबडीचे अंडी/मांस, मासे, उरलेले अन्न इत्यादी उघड्यावर ठेवू नका. यामुळे बिबट्याला आकर्षण होऊ शकते.
कुत्र्यांना रात्री बांधून ठेवा.रात्री कुत्र्यांना घराबाहेर मोकळे सोडू नका. बिबट्या प्रथम कुत्र्यांनाच हल्ला करतो.
घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत पिल्लू/कोंबड्या ठेवताना सावध रहा.रात्रीच्या वेळी त्यांना घरात ठेवा.किंवा मजबूत जाळी लावलेली पिंजरा वापरा.
बिबट्या दिसल्यास
बिबट्या दिसल्यास घाबरू नका, पण जवळ जाऊ नका
शांतपणे मागे जा.डोळ्यात डोळे घालू नका.
हात वर करून मोठा दिसण्याचा प्रयत्न करा
हळूहळू मागे फिरून सुरक्षित ठिकाणी जा
बिबट्याने हल्ला केल्यास 100 किंवा 112 (पोलिस) वर फोन करा.बिबट्याला मारण्याचा प्रयत्न करू नका. तो घाबरला तर अधिक धोकादायक होऊ शकतो. वन विभागाला बोलावणे हाच सर्वात सुरक्षित मार्ग आहे.
वनविभागाकडून चार पिंजरे
रत्नागिरी शहरात बिबट्या दिसल्यामुळे वनविभागाने चार ठिकाणी पिंजरा लावण्यात येणार आहे.तसेच सीसीटिव्ही लावून बिबट्यावर नजर ठेवण्यात येणार आहे.बिबट्याला पकडण्यासाठी सात जणांचे पथक तयार करण्यात येणार आहे.बिबट्याचा शोधासाठी पोलीस विभाग श्वान पथक तैनात ठेवण्यात येणार आहे.































































