
संरक्षण मंत्रालयात संरक्षण उत्पादन विभागात तैनात असलेल्या ले. कर्नल दीपक शर्मा यांना सीबीआयने तीन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ जेरबंद केले. बंगळुरू येथील एका पंपनीला लाभ मिळवून देण्याच्या बहाण्याने शर्मा यांनी लाच मागितली होती. शर्माची पत्नी कर्नल काजल बाली हिच्याविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
शर्मा हे आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि निर्यात विभागात उप नियोजन अधिकारी म्हणून तैनात होते. शर्मा याने बंगळुरू येथील राजीव यादव आणि रवजीत सिंग यांच्याकडून लाच मागितली होती. सीबीआयकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर तत्काळ कारवाई करण्यात आली. सीबीआयने शर्मा याच्या दिल्लीतील घरातून 2 कोटी 23 लाख आणि राजस्थानमधील श्रीगंगानगर येथील घरातून 10 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले.

























































