आसाममध्ये एक्स्प्रेसच्या धडकेत 7 हत्तींचा मृत्यू

आसाममधील होजई जिल्ह्यात आज भयानक रेल्वे अपघात झाला. साईरंग-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसने हत्तीच्या कळपाला दिलेल्या धडकेत 7 हत्तींचा जागीच मृत्यू झाला, तर एक हत्ती जखमी झाला. या अपघातामुळे ट्रेनच्या इंजिनासह पाच डबे रुळावरून घसरले. सुदैवाने यात कोणताही प्रवासी जखमी झाला नाही.

चांगजुराई गावाजवळ शनिवारी पहाटे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता विभागीय वन अधिकाऩयांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी या घटनेची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघातानंतर या मार्गावरील अनेक रेल्वे गाडय़ा रद्द करण्यात आल्या.