
उरण नगरपरिषदेच्या मतमोजणीला काही तास बाकी असतानाच उरण भाजपचा आयटीसेलचा पदाधिकारी प्रसाद मांडळकर हा नगरपरिषदेच्या इमारतींमध्ये घुसुन बाहेर आला.ही गंभीर बाब मविआच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्याला धरून पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांना त्याने चहा नाश्ता पुरवठा करणारा ठेकेदार असल्याचे सांगितले. मागील १५ दिवस स्ट्राँगरुमवर बाहेर अहोरात्र जागता पहारा ठेवला असताना भाजपचा पदाधिकारी स्ट्राँगरुममध्ये घुसलाच कसा असा प्रश्न शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व माजी आमदार मनोहर भोईर व नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी केला आहे. याबाबत अधिकृत प्रतिक्रिया पोलिस, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेली नाही.




























































