चिपळूण नगरपरिषदेत शिवसेनेचे पाच नगरसेवक विजयी

चिपळूण नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पाच उमेदवार नगरसेवकपदी निवडून आले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांच्या सुकन्या कांचन शिंदे विजयी झाल्या आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अजय भालेकर हे प्रभाग ४ अ मधून १२९२ मते घेऊन विजयी झाले. त्यांनी आशिष खातू यांचा ३६९ मतांनी पराभव केला. प्रभाग क्र.४ ब मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार वैशाली कदम यांना ११९६ मते मिळाली. त्यांनी सुरैय्या फकीर यांचा १६१ मतांनी पराभव केला. प्रभाग क्र.६ ब मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संजय गोताड यांना ४६१ मते मिळाली. त्यांनी विष्णू लाणे यांचा ५ मतांनी पराभव केला. प्रभाग क्र.१४ अ मधून शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या सुकन्या कांचन शिंदे यांना १०१६ मते मिळाली. त्यांनी शीतल रानडे यांचा १३५ मतांनी पराभव केला. ब मधून मिथिलेश उर्फ विक्की नरळकर यांना ११७९ मते मिळाली त्यांनी सुयोग चव्हाण यांना ६९ मतांनी पराभव केला.