रत्नागिरीत शिवसेनेचे तीन उमेदवार विजयी

रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेचे तीन उमेदवार निवडून आले आहेत. प्रभाग क्र.4 मधून केतन शेटये आणि फौजिया मुजावर विजयी झाले, तर प्रभाग क्र.15 मधून अमित विलणकर विजयी झाले आहेत. केतन शेटये यांना 929 मते मिळाली. प्रतिस्पर्धी अजित पवार गटाचे उमेदवार नौसीन काझी यांना 786 मते मिळाली. शिंदे गटाचा उमेदवार तिसऱया क्रमांकावर फेकला गेला. शिंदे गटाचे उमेदवार इलयास खोपेकर यांना 540 मते मिळाली. केतन शेटये 143 मतांनी विजयी झाले.

प्रभाग 4 अमधील शिवसेना उमेदवार फौजिया मुजावर यांना 863 मते मिळाली. प्रतिस्पर्धी अजित पवार गटाच्या उमेदवार मुनवर मुल्ला यांना 721 मते मिळाली. शिंदे गटाच्या उमेदवार वंदना देसाई यांना 590 मते मिळाली. फौजिया मुजावर 142 मतांनी विजयी झाल्या. तसेच प्रभाग क्र.15 मधून शिवसेनेचे अमित विलणकर यांना 998 मते मिळाली. प्रतिस्पर्धी शिंदे गटाचे उमेदवार सुशांत चवंडे यांना 728 मते मिळाली. अमित विलणकर 270 मतांनी विजयी झाले.