
पश्चिम बंगालमध्ये ‘प्रतिबाबरी’ उभारण्याची घोषणा करणारे तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार हुमायूं कबीर यांनी नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. जनता उन्नयन पार्टी असे या पक्षाचे नाव आहे.
कबीर यांनी स्वतः आज याची माहिती दिली. त्यांचा पक्ष पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक लढणार असून अल्पसंख्याकांचे वर्चस्व असलेल्या काही जागांवरील उमेदवारांची घोषणाही कबीर यांनी केली आहे.
हुमायूं कबीर हे भरतपूरचे आमदार आहे. मुर्शिदाबाद येथे प्रतिबाबरीची पायाभरणी केल्यामुळे कबीर प्रकाशझोतात आले आहेत. त्यांच्या वादग्रस्त भूमिकेमुळे ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसमधून त्यांची हकालपट्टी केली आहे. पुढील निवडणुकीत ते रेजीनगर व बेलडांगा या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढणार आहेत.

























































