ट्रेंड – मॉलच्या मधोमध बसून तरूणीला प्रपोज केले अन्…

गाझियाबादच्या गौर सेंट्रल मॉलमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. नेहमीप्रमाणे गजबजलेला मॉल, लोकांची ये-जा सुरू असतानाच अचानक एक तरुण मॉलच्या मधोमध आपल्या प्रेयसीसमोर गुडघ्यावर बसतो आणि तिला प्रपोज करतो. मुलगी तरुणाला होकार देते आणि तेवढय़ात तो तरुण खिशातून कुंकू काढतो. मग काही क्षणांतच तो तिच्या कपाळावरील भांगात कुंकू भरतो आणि गळ्यात मंगळसूत्रही घालतो. उपस्थित हा क्षण कॅमेऱ्यात पैद करतात आणि तिथूनच हा व्हिडीओ व्हायरल झाला.