बिग बॉस फेम अभिनेत्याने केला साखरपुडा, या राज्यात पार पडला सोहळा

बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता जय दुधाने याने त्याची गर्लफ्रेंड व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षला पाटीलसोबत साखरपुडा केला आहे. उत्तराखंडमधील मसुरीच्या डोंगरदऱ्यांत हा सोहळा पार पडला.

जयची होणारी पत्नी हर्षला पाटील ही एक प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर आणि व्हिडीओ इन्फ्लुएन्सर आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स असून फॅशन आणि ट्रॅव्हलशी संबंधित तिचे व्हिडीओ विशेष लोकप्रिय आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून जय आणि हर्षला एकमेकांना डेट करत होते.