
आजकाल अनेकांना अगदी चाळिशीमध्ये गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो. मात्र योग्य आहार आणि व्यायामाचा समावेश दिनचर्येत समावेश केल्यास त्रास कमी होऊ शकतो. तज्ञ डॉक्टरांनी सांगितलेल्या काही टीप्स गुडघ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
गुडघा दुखत असल्यास विश्रांती घ्यायला हवी. धावणे, चालणे अशी कामे टाळावी.
गुडघ्याभोवतीच्या स्नायूंना बळकटी देणारे व्यायाम करायला हवे. सायकल चालविणे, पोहणे आणि चालणे हे व्यायाम उपयुक्त ठरतात. दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून राहणे टाळावे. वजन वाढू नये याचीही काळजी घ्यावी.































































