
रेशन कार्ड अनेकदा खराब होते किंवा फाटण्याची भीती असते. असे रेशन कार्ड खूप सांभाळून ठेवावे लागते. यावर एक उपाय आहे, तो म्हणजे पीव्हीसी रेशन कार्ड.
रेशन कार्ड अॅपमध्ये डिजिटल स्वरूपात डाऊनलोड करता येते. पीव्हीसी कार्ड छापून घेता येते. त्यासाठी मेरा रेशन अॅप डाऊनलोड करा. आधार क्रमांक भरून लॉगीन करा.
अॅपमध्ये लॉगीन केल्यानंतर अॅपच्या होम स्क्रीनवर डिजिटल रेशन कार्ड दिसेल. त्यात कुटुंबप्रमुखाचा तपशील तसेच कुटुंबातील इतर सदस्यांची माहिती असेल.
अॅपवर ई-रेशन कार्ड डाऊनलोड करण्याचा पर्याय आहे. तेथून तुमच्या पह्नमध्ये डिजिटल रेशन कार्डची पीडीएफ प्रत डाऊनलोड करून घ्या. त्याचेच पीव्हीसी कार्ड बनवून घ्यावे.
पीव्हीसी कार्ड बनवून घेण्यासाठी जवळच्या पीव्हीसी कार्ड प्रिंट करण्याची सुविधा देणाऱया पेंद्रावर संपर्क करा. तेथून ई-रेशन कार्डची पीव्हीसी प्रत प्रिंट करून घ्या.




























































