दिबांसाठी भूमिपुत्रांचा गनिमी कावा, छायाचित्रे झळकावून जोरदार घोषणाबाजी

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्रांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. तरीही आंदोलन होईल या भीतीने विमानतळ प्रशासन आणि पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे भूमिपुत्रांनी आज गनिमी काव्याने आंदोलन केले. शेकडो भूमिपुत्र बुधवारी रात्री बंगळुरूत दाखल झाले आणि इंडिगोच्या विमानातून आज प्रवास करून नवी मुंबई गाठली. विमानतळावर उतरल्यानंतर भूमिपुत्रांनी दिबांची छायाचित्रे झळकावून जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात दिबांचे नातू अनुप पाटील, सून मनीषा पाटील, माजी खासदार संजीव नाईक, कल्पना नाईक आदी सहभागी झाले होते.