
महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून गंभीर समस्या होत चालली आहे. हिंदुस्तानात दरवर्षी याचा आकडा वाढत असून आरोग्य तज्ञ आणि संशोधन संस्था त्याची कारणे आणि जोखीम यांचा सतत अभ्यास करत आहेत. अशातच इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा एक अहवाल सध्या चर्चेत आला आहे. ज्यामध्ये महिलांची लाईफस्टाईल आणि डाएट याचे स्तनाच्या कर्करोगाच्या धोक्याशी जोडले गेले आहे. यामध्ये खाण्यापिण्याच्या सवयी, झोप, लठ्ठपणा आणि जीवनशैलीचा विश्लेषण केले गेले आहे.
आयसीएमआरच्या अभ्यासानुसार, ज्या महिला अधिक मांसाहार करतात त्यांना शाकाहारी महिलांच्या तुलनेत स्तनाच्या कर्करोगाचा थोडा जास्त धोका असतो. हा अहवाल अनेक संशोधनांच्या आकड्यांशी मिळून केलेला आहे. यावरून अधिक मांसाहार खाणे, विशेष करुन चरबीयुक्त पदार्थ आरोग्यावर परिणाम करतं.
अभ्यासात सांगण्यात आले की, मांसाहार खाण्यासोबत व्यायामाचा अभाव, अपूर्ण झोप आणि लठ्ठपणा वाढला तर धोका वाढू शकतो. संशोधकांनी थेट मांसाहार खाणे हे स्तनाच्या कर्करोगाचे कारण नाही, पण शक्यता वर्तवली आहे. जर योग्य प्रमाणात संतुलित आहार न घेतल्यास शरीराच्या हार्मोनल संतुलनावर परिणाम होऊ शकतो, जो पुढे मोठी समस्या बनू शकतो.
अशी घ्या काळजी
संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या.
मांसाहार मर्यादित आणि योग्य पद्धतीने खा
तळलेले आणि प्रक्रिया केलेले फूड खाणे टाळा
नियमित व्यायाम करणे आवश्यक
वजन नियंत्रणात ठेवा
पूर्णपणे झोप आवश्यक
वेळोवेळी आरोग्य तपासणी आवश्यक



























































