
म्यानमारमध्ये रविवारी पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुकांना सुरुवात झाली. देशाच्या अनेक भागांमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धादरम्यान लष्कराच्या देखरेखीखाली या होत आहेत. यावेळी पहिल्यांदाच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर केला जात आहे.
तज्ञांचे म्हणणे आहे की, ही निवडणूक लष्करी राजवटीला लोकशाहीचा मुखवटा चढवण्यासाठी आयोजित केली जात आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये लष्कराने नोबेल विजेत्या आंग सान सू ची यांच्या निवडून आलेल्या सरकारचा सत्तापालट करून सत्ता बळकावली होती.



























































