मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी 401 अर्ज दाखल

मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 23 निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून एकूण 1 हजार 225 नामनिर्देशन अर्जांचे आज वितरण करण्यात आले आहे, तर, 357 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. मुंबई महापालिकेच्या सर्व निवडणूक कार्यालयात आतापर्यंत एकूण 401 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. 30 डिसेंबर 2025 हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून दुपारी 4 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रांचे वितरण होईल. तर, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.