पुण्यात शिवसेना, काँग्रेस, मनसेची आघाडी पक्की

पुणे महापालिकेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि मनसेसह समविचारी पक्षांची महाविकास आघाडी पक्की झाली आहे. पहिल्या टप्प्यात काँग्रेसला 60 जागा तर शिवसेनेला 45 जागांचे वाटप अंतिम झाले आहे. त्या जागांवरील उमेदवारांना दोन्ही पक्षांनी एबी फॉर्म दिले आहेत. उर्वरीत जागांचेही वाटप अंतिम टप्प्यात आहे. मंगळवारी सकाळपर्यंत उर्वरित सर्व जागावाटपाचा निर्णय होईल, अशी माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर, पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, शिवसेना उपनेते, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचिक, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, काँग्रेसचे पुणे शहर प्रभारी, आमदार सतेज पाटील, माजी नगरसेवक प्रशांत बधे, काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार दिप्ती चवधरी, अॅड.अभय छाजेड आदी उपस्थित होते.

सचिन अहिर म्हणाले, 90 टक्के जागांवर एकमत झाले आहे. शिवसेना ही मनसेसोबत चर्चा करीत आहे. मनसेने 32 जागांची यादी दिली आहे. त्यातील 21 जागांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. शिवसेना आणि कॉंग्रेस यांच्याच चर्चा होऊन जागा वाटप करण्यात येत आहे. दोन्ही पक्ष त्यांच्या कोटय़ातील जागा सोबतच्या समविचारी पक्षांशी चर्चा करून त्यांना जागा देणार आहेत. त्या चर्चा सुरू असल्याने उर्वरीत जागांवर अंतीम निर्णय अद्याप घेतलेला नाही.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अचानक बदललेल्या भुमिकेवर सतेज पाटील म्हणाले, मी स्वतŠ अंकुश काकडे यांच्याशी बोललो. ते नंतर चर्चेला आले नाहीत. महाविकास आघाडीत प्रमुख तीन पक्षांशी चर्चा करताना जागावाटपही तसे केले जाते. त्यामुळे यावेळी आम्ही गाफील नव्हतो, दक्ष होतो. कोण कुठे गेले तरी आमची चर्चा सुरू होती.

भाजपकडून 7 वर्षांत पुण्याचे वाटोळे – सतेज पाटील

महायुतीने सात वर्षात पुण्याचे वाटोळे केले आहे. कायदा सुव्यवस्था, वाहतुककाsंडी, पाणी, कचरा आदीबाबत महायुतीच्या काळात निगेटीव्हीटी तयार झाली आहे. लोकशाही महापालिकेत टिकली पाहिजे. मुख्यमंत्री, पालकमंत्री तुमचे असताना पुण्याला 22 टीएमसी पाणी मिळत नाही.सत्तेचा वापर स्वतŠच्या फायद्यासाठी सोयीस्कर होत आहे. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसच्या माध्यमातून पुणेकरांना चांगला पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. निवडणुकीत पुणे फर्स्ट याला प्राधान्य असून, त्याबाबतचा जाहीरनामा आम्ही 4 किंवा 5 जानेवारीला प्रसिद्ध करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

पुण्यात शिवसेना, काँग्रेस हाच सक्षम पर्याय

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्तेतील पक्ष आहेत. निवडणुकीत विरोधकांना स्पेस ठेवायचाच नाही असे नियोजन भाजपने केले होते. मंत्रीमंडळात एकत्र बसणारे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने तात्पुरता घटस्पह्ट घेतला आहे. निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र यायचे अशी त्यांची भुमिका दिसते. पुणेकरांना या गोष्टी लक्षात येतात. मात्र, पुण्यात कॉंग्रेस आणि शिवसेनेने सक्षम पर्याय दिला आहे असे अहिर यांनी स्पष्ट केले.