भाजपामध्ये प्रवेशानंतर चार दिवसांत ‘यू-टर्न’? अजित पवार गटात सोलापूरमध्ये पेच

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सध्या खळबळ उडाली असून, सोलापूरच्या राजकारणात महत्त्वाची उलथापालथ पाहायला मिळत आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी मध्यरात्री भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दोन माजी नगरसेककांच्या पुन्हा घरवापसीसाठी हालचाली सुरू झाल्याने राजकीय कर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

भाजपकडून महानगरपालिका निकडणुकीसाठी उमेदवारी निश्चित न झाल्याने हे दोन्ही माजी नगरसेवक पुन्हा अजित पवार गटात परतण्यास इच्छुक असल्याची विश्कसनीय माहिती समोर येत आहे. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश हा केवळ तात्पुरता निर्णय होता का? असा सवाल उपस्थित होत आहे.

या पार्श्वभूमीकर अजित पकार गटाचे राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोकर येथे महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत दोन्ही माजी नगरसेककांच्या घरवापसीबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तकिली जात आहे. मात्र, या घरवापसीला पक्षांतर्गत जोरदार विरोध होत असल्याचे चित्र आहे. शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागकान यांनी या दोन्ही माजी नगरसेककांना पुन्हा पक्षात प्रकेश दिल्यास आम्ही आमच्या पदांचा राजीनामा देऊ, अशी आक्रमक भूमिका घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे ही घरकापसी सध्या तरी रडखडली आहे. आता शिंदे गटाचीही यात एन्ट्री झाल्याची चर्चा आहे. कारण या दोन्ही माजी नगरसेककांना राष्ट्रकादीत प्रवेश दिल्यास त्याचा थेट परिणाम त्यांच्या स्थानिक राजकीय समीकरणांकर होण्याची शक्यता आहे.