
दुषित पाणी प्यायल्याने इंदूरच्या भागीरथपुरामध्ये दोन महिलांसह एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. तर 150 हून अधिक जणांना उल्टी, जुलाबाचा त्रास सुरु झाला आहे. सीमाबाई प्रजापत आणि उर्मिला यादव अशी मृत महिलांची नावे आहेत. तर नंदलाल पाल असे वृद्ध इसमाचे नाव आहे.
दोन्ही महिलांनी दुषित पाणी प्यायल्यानंतर त्यांना उल्टी जुलाबाचा त्रास सुरू झाला. अखेर त्यांना रूग्णालयात नेण्यात आले. एकिचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला तर दुसरीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर वृद्ध नंदलाल पाल यांना वर्मा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. जिथे डॉक्टरांनी सीपीआर देऊन त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची झुंज अपयशी ठरली. भागीरथ परिसरात 24 डिसेंबर रोजी उल्टी जुलाबच्या तक्रारी यायला लागल्या होत्या. आतापर्यंत 150 हून अधिक लोकं आजारी पडली आहेत. सोमवारी 35हून अधिक रुग्णांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंर संख्या वाढत गेलीय
आरोग्य विभागाने यामागे दोन कारण असल्याची शक्यता वर्चविण्यात आली आहेत. खोदकामादरम्यान ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे दुषित पाणी त्या पाण्यात मिसळले असेल किंवा दुसरे कारण म्हणजे टाकी दुषित असणे. सध्या स्थिती नियंत्रणात असल्याचे सीएमएचओ डॉक्टर माधव हसानी यांनी सांगितले. तसेच तिघांचा मृत्यू दुषित पाण्याने झाल्याचा आरोप फेटाळला आहे. सध्या रुग्णांचे रक्ताचे नमुने घेतले असून त्याची तपासणी केली जात आहे.

























































