
‘कौन बनेगा करोडपती’ रिअॅलिटी शोच्या शेवटच्या एपिसोडचे शुटींग नुकतेच झाले. हे शुटींग फार खास आणि अनोखे होते. होस्ट महानायक अमिताभ बच्चन यांनी खास माहोल तयार केला होता. ज्यात अमिताभ 32 मिनीट सातत्याने गाणे गाऊन हा एपिसोड यादगार केला आहे, या शोच्या ग्रॅण्ड समारोपाच्या कार्यक्रमात अमिताभ त्यांचे सुपरहिट आणि यादगार गाणी प्रेक्षकांसमोर गाताना दिसणार आहेत.
केबीसीच्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा भावूक आणि वेगळा अंदाज सर्वांनाच पाहायला मिळणार आहे. हा खास क्षण तेव्हाच पाहायला मिळेल जेव्हा सेटवर खास व्हिडीओ चालवला जाईल. ज्यामध्ये संपूर्ण सिझनच्या आठवणी आणि भावनात्नक क्षण दाखवले जातील. हा व्हिडीओ ज्यावेळी स्टेजवर दाखवला जाईल त्यावेळी सेटवर एक खास माहोल तयार होईल. हा व्हि़डीओ पाहून कंटेस्टंट्स, प्रेक्षक आणि खुद्द अमिताभ बच्चनही भावूक होतील.सर्वांचा मूड चांगला करण्यासाठी अमिताभ बच्चन माईक हातात घेतील आणि न थांबता 32 मिनीट पर्यंत गातात. या दरम्यान प्रेक्षकही भारावूक जातात आणि उभे राहून टाळ्या वाजवतात. त्यांच्यासोबत गातात आणि त्यांना चीअर करताना दिसतील.
‘कौन बनेगा करोडपती’ हा एक सामान्य ज्ञान वाढवणारा शो आहेत. शिवाय हा एक सिनेमा आणि वेबसिरीजच्या प्रमोशनसाठी हक्काचे व्यासपीठ होते. यावर्षी अनेक कलाकारांनी या शो मध्ये उपस्थिती लावली होती. येत्या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा या शो मध्ये दिसणार आहे. तो आपला येणारा सिनेमा ‘इक्कीस’च्या प्रमोशनसाठी येणार आहे. त्याच्यासोबत सिनेमाची संपूर्ण टीम असेल. सोबत श्वेता बच्चन आणि नव्या नवेली नंदा ऑडियन्समध्ये उपस्थित असणार आहे.






























































