
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्वित्झर्लंड च्या प्रसिद्ध क्रांस मोंटाना शहरामध्ये नव्या वर्षाचे सेलिब्रेशन सुरु असताना ले कॉन्स्टेलेशन बारमध्ये स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये अनेक लोकांचा होरपळल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून अनेक जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला आहे.
वॉलेस कॅंटन पोलीसांच्या माहितीनुसार, न्यू ईयर ईव सेलिब्रेशन दरम्यान क्रांस मोंटाना स्थित ले कॉन्स्टेलेशन नावाच्या बारमध्ये एकापेक्षा अधिक स्फोट झाले. ज्यानंतर आगीने रौद्र रुप धारण केले. ही घटना जवळपास रात्री दीडच्या सुमारास लागली. त्यावेळी नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी अनेक जण उपस्थित होते.

























































