पाकिस्तानात शिक्षा पूर्ण केल्यानंतरही परतीची वाट पाहत आहेत १६७ हिंदुस्थानी कैदी, सरकारने दिली माहिती

हिंदुस्थान आणि पाकिस्तानने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एकमेकांच्या ताब्यात असलेल्या नागरी कैद्यांच्या आणि मच्छिमारांच्या यादीची देवाणघेवाण करण्यात आली आहे. वर्ष २००८ च्या कॉन्सुलर अॅक्सेसवरील द्विपक्षीय कराराच्या तरतुदींनुसार या यादीची देवाणघेवाण करण्यात आली. केंद्र सरकारने ही माहिती जाहीर केली आहे.

या यादीत पाकिस्तानने ५८ नागरी कैदी आणि १९९ मच्छिमार हिंदुस्थानी असल्याचे नमूद केले आहे. यापैकी १६७ हिंदुस्थानी मच्छिमारे आणि नागरी कैदी यांनी आपली शिक्षा पूर्ण केली आहे. असे असूनही ते पाकिस्तानच्या तुरुंगात अडकले आहेत, त्यांना पुन्हा मायदेशी परतण्याची प्रतीक्षा आहे. केंद्र सरकारने पाकिस्तानकडे या १६७ कैद्यांची तात्काळ सुटका आणि हिंदुस्थानात परत पाठवण्याची मागणी केली आहे.