
श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा आहे. भाविक भक्तिभावाने साईबाबांच्या चरणी मनोभावे दान अर्पण करत असतात. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हरियाणा राज्यातील फरीदाबाद येथील साईभक्त प्रदीप मोहंती व प्रतिमा मोहंती यांनी श्री साईबाबांच्या चरणी ६५५ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षिकाम असलेला सुवर्ण-हिरे जडीत मुकुट अर्पण केला.
साईबाबांच्या चरणी 655 ग्रॅम वजनाचा सुवर्ण-हिरे जडीत मुकुट अर्पण pic.twitter.com/Zkxr6hQ81W
— Saamana Online (@SaamanaOnline) January 1, 2026
हा मुकुट श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. सदर मुकुटाची अंदाजे किंमत सुमारे ८० लाख रुपये असून त्यामध्ये अंदाजे ५८५ ग्रॅम शुद्ध सोने व सुमारे १५३ कॅरेटचे मौल्यवान हिरे आहेत. या प्रसंगी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दानशूर साईभक्त प्रदीप मोहंती व प्रतिमा मोहंती यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले.





























































