नवीन वर्षाची सुरुवात पावसाने

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी सकाळी वरुणराजाने मुंबईत हजेरी लावली. सध्या थंडीची तीव्रता वाढली असतानाच शहराच्या बहुतांश भागांत पाऊस पडल्याने मुंबईकर गोंधळले. पावसाच्या हजेरीने शहर आणि उपनगरांतील वातावरणात गारवा निर्माण झाला. बराच वेळ पावसाची रिपरिप सुरू राहिल्यामुळे एल्फिन्स्टन पुलाजवळ पाणी साचले होते. त्यामुळे नोकरदार मंडळींची गैरसोय झाली.