
उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर जळगावात अजित पवार गटाच्या महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी राजीनामा दिला होता. आता त्यांनी अजित पवार यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. ‘आमच्या शेंबडयाला नेता करा आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांनो तुम्ही फक्त पाणी भरा’ अशा शब्दात तोफ डागली आहे. ज्याला समाजकारणाची आणि राजकारणाची काळजी नाही, अशा नेत्याच्या मुलासाठी जागा राखून ठेवल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
पाटील यांनी पत्रात लिहिले की, जळगाव शहर व जिल्ह्यात पक्षाचे नेतृत्व आपण ज्यांच्याकडे सोपवले आहे, त्यांनी महापालिका निवडणुकीतील जागावाटपातून पुन्हा एकदा स्वत:चा खरा चेहरा दाखवून दिला आहे. मिळालेल्या जागांचा सौदा करून पक्षाची इभ्रत पणाला लावली, राष्ट्रवादीच्या घडयाळ चिन्हावर भाजपचे चेहरे निवडणूक लढत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.




























































